Tell a Friends

Tell a Friend

Social Icons

Pages

Friday, February 13, 2009

मन मोकळं

मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !

तुमचं दु:ख खरं आहे,
कळतं मला,
शपथ सान्गतो, तुमच्याइतकंच
छळतं मला;
पण आज माझ्यासाठी
सगळं सगळं विसरायचं,
आपण आपलं चांदणं होऊन
अंगणभर पसरायचं !

सूर तर आहेतच : आपण फक्त झुलायचं !
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !

आयुष्यात काय केवळ
काटेरी डंख आहेत?
डोळे उघडून पहा तरी :
प्रत्येकाला फुलपाखराचे पंख आहेत !

हिरव्या रानात,
पिवळ्या उन्हात जीव उधळून भुलायचं !
मन मोकळं,
अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !

प्रत्येकाच्या मनात एक गोड गोड गुपीत असतं,
दरवळणारं अत्तर जसं इवल्याशा कुपीत असतं !

आतून आतून फुलत फुलत विश्वासाने चालायचं !
मन मोकळं,
अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं

-POOJA PATIL
- LoveNismi ( Ansh Rav)

0 comments: